सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 22 मार्च 2023 (08:48 IST)

जतच्या रामपूर मध्ये प्रेमी युगलाची आत्महत्या; घातपाताच्या संशय

suicide
जत तालुक्यातील रामपूर येथील कोळेकर वस्ती येथे दोन प्रेमी युगलांची आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या आठ दिवसापासून जत तालुक्यात खुनाचे सत्र सुरूच आहे, त्यात ही घटना घडल्याने हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात याबाबत आता पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
उमेश उर्फ पिंटू अशोक कोळेकर वय 23 व तर प्रियंका बाळासाहेब कोळेकर वय 25 अशी या दोघांची नावे आहेत.

यातील उमेश याने रामपूर गावा जवळील ओढ्या नजीक विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. तर प्रियंकाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेश रामागरे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या दोन्ही आत्महत्याची कारणे देखील तपासण्यात येत आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor