1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (12:53 IST)

SSC Board Exam 2023 : आजपासून मिळणार हॉलतिकीट

SSC Board Exam 2023 : दहावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र आजपासून (6 फेब्रुवारी) दुपारी तीन वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. दहावीच्या परीक्षा 2 मार्च ते 25 मार्चदरम्यान होणार असल्यामुळे विद्यार्ध्यांना प्रवेशपत्रात काही दुरुस्ती करायची असल्यास भरपूर वेळ मिळणार आहे. 
 
अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली आहे. राज्यातील सर्व माध्यमिक शाळांनी दहावी बोर्ड परीक्षेसाठी फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकीट प्रिंट करून देण्याचा सूचना शिक्षण मंडळाकडून देण्यात आला आहेत.