शुक्रवार, 27 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (20:04 IST)

इंधन दरवाढीमुळे आता एसटी प्रवास महागणार

इंधनाच्या दरवाढीमुळे एसटी प्रवास करणाऱ्यांसुद्धा यापासून सुटका मिळणार नसल्याचं चित्र दिसत आहे. इंधन दरवाढीमुळे आता एसटी प्रवास देखील महागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
 
इंधन दरवाढीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला मोठा तोटा झाला आहे. सुमारे 12500 कोटी रुपयांचा तोटा एसटी महामंडळाला झाल्याने एसटी तिकीटांच्या किंमती 17 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे.
 
कोरोनाकाळात प्रवासी संख्या घटल्याने एसटी महामंडळाला मोठा तोटा झाला. त्यामुळे 12 तास काम करुनसुद्धा अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. गेल्या 4 दिवसांपासून सलग पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे.