एका बापाचे असाल तर राजीनामे द्या’; संजय राऊतांचे बंडखोरांना आव्हान
मंत्री एकनाथ शिंदेच्या बंडामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. नेते शिवसेना सोडून जात आहेत पण शिवसैनिक उद्धव ठाकरेंबरोबर असल्याचे दिसून येत आहे.राज्यात शैवसिनिक आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांचा निषेध केला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते पुन्हा संघटनात्मक बंदी मजबूत करण्यासाठी मुंबईत ठीक ठिकाणी मळावे घेत आहेत. शिवसेनेचा आज दहिसरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेतेमंडळी उपस्थित होते. या मेळाव्यात संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना बंडखोर आमदारांवर टीका केली. “तुम्ही एका बापाचे असाल तर राजीनामे द्या. निवडणुकीला आमच्या समोर उभे राहा. नजरेला नजर भिडवून समोर या. पण एकातही ती हिंमत नाही.”, असे राऊत यावेळी म्हणाले.
“तुम्ही एका बापाचे असाल तर राजीनामे द्या. निवडणुकीला आमच्या समोर उभे राहा. नजरेला नजर भिडवून समोर या”, असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केले आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले. यावरूनही संजय राऊतांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. “शिवसेनेला एकच बाप आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे”, हे पळून गेले त्यांचे जवळपास २० ते २५ बाप आहेत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला.