1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. महाराष्ट्र अर्थसंकल्प
Written By
Last Updated : सोमवार, 6 मार्च 2023 (11:18 IST)

राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन :राज्यपालांनी अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात केली

State Legislature Budget Session
आजपासून (27 फेब्रुवारी) राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे.आगामी चार आठवडे राज्यातील राजकारणात पुन्हा शिवसेना विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पहायला मिळेल.राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने राज्याच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. आपल्या अभिभाषणात राज्यपालांनी राज्यसरकारच्या कामांची तसेच विविध राबवणाऱ्या योजना ,लागणाऱ्या मदतनिधीची, मेट्रोच्या नवीन योजना बाबत माहिती दिली. अभिभाषणात राज्यपालांनी मराठा समाजाच्या हिताच्या विशेष योजना, राज्यातील तरुणांसाठी नोकऱ्या, जुन्या पेन्शन योजनेत बदल, गुंतवणुकीचे करार आणि राज्यसरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. 
Edited By- Priya Dixit