गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (15:31 IST)

वंचित बहुजन आघाडीचे विधानभवनासमोर जोरदार आंदोलन

ओबीसींच्या आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीने विधानभवनासमोर जोरदार आंदोलन केलं. वंचितच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हे आंदोलन आम्ही गावपातळीपर्यंत घेऊन जाऊ असं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं.
 
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या दोन्ही सरकारांना ओबीसींना आरक्षणच द्यायचं नाहीये, असा दावा आंबेडकर यांनी केला. मंडल आयोगापेक्षाही आता मोठी लढाई असणार आहे. आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. राज्यभर हे आंदोलन घेऊन जाऊ. तालुका आणि गावपातळीपर्यंत ही लढाई लढली जाईल, असं आंबेडकर म्हणाले. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे. एकदा जनगणना केली तर राजकीय आरक्षणही आपोआप मिळेल, असं ते म्हणाले. या सरकारने केवळ ओबीसीच नव्हे तर मराठा आरक्षणाचंही वाटोळं केलं आहे. गरीब मराठ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सरकारने केलं आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.