बुधवार, 29 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 जानेवारी 2020 (14:07 IST)

अंबाबाईच्या मंदिराचे व जोतिबा मंदिराचे लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट

Structural audit of Ambabai temple and Jotiba temple soon
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिराचे आणि दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिराचे लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. पुढच्या आठवड्यात त्याचं काम सुरु होणार असून मुंबईतल्या एका कंपनीकडून नाममात्र मानधनावर हे ऑडिट करण्यात येणार आहे. 
 
स्ट्रक्चरल ऑडिट अर्थातच इमारत संरचना पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पुढाकार घेतला असून यातून मंदिराच्या बांधकामाची स्थिती, स्थिरता याबाबतची सद्यस्थिती समजणार आहे. मंदिर संवर्धन करण्यासाठीही या अहवालाचा उपयोग होणार आहे. तर मंदिराची पडझड झालेला भाग आणि त्याची दुरुस्ती करणेही शक्य होणार आहे तसेच मंदिराच शिल्पसौंदर्य जतनही होणार आहे.