शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (20:55 IST)

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांनो सावधान! ‘ही’ चूक करू नका!

नाशिक (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 या कालावधीत, तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे. राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील सूचना दिल्या आहेत. राज्य मंडळाकडून या सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
दुसरीकडे दहावी बारावीच्या पेपर फुटीला ब्रेक लावण्यासाठी राज्य मंडळांना सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या सूचना विद्यार्थ्यांना देखील शाळेत वाचून दाखवण्याचे निर्देश शाळा प्रशासनाला देण्यात आले आहेत. यात महत्त्वाचं म्हणजे दहावी-बारावीची प्रश्‍नपत्रिका मोबाईलवर व्हायरल केल्यास परीक्षार्थीला पाच वर्ष परीक्षा देता येणार नाही असा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
 
असा प्रकार करताना कोणी आढळल्यास त्यांच्या विरोधातही आता फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. तसेच उत्तर पत्रिकेत मोबाईल क्रमांक टाकून संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor