गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (18:02 IST)

बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बुधवार पासून मिळणार हॉल तिकीट

Students will get hall tickets for Class XII examination from Wednesday बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बुधवार पासून मिळणार हॉल तिकीट Marathi Regional News In Webdunia Marathi
मार्च- एप्रिल 2022मध्ये होणारी इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उद्यापासून महाविद्यालयात उपलब्ध होणार. इयत्ता बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. बारावीची परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या दरम्यान ऑफलाईन होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने या बाबत प्रसिद्धी पत्रक दिले असून या पत्रकात नमूद केले आहे की या हॉल तिकीटाची प्रत ऑनलाईन डाउनलोड करून त्याचे प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यपकांची सही व शिक्का घेऊन विद्यार्थ्यांना दिली जावी असे सांगण्यात आले आहे. हे हॉल तिकीट  उद्या बुधवार पासून महाविद्यालयांना मंडळाच्या संकेत स्थळ www.mahasscboard.in वरून डाउनलोड करून मिळतील.