बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (17:24 IST)

मी काही त्यांच्यावतीने बोलण्याचा ठेका घेतलेला नाही : राऊत

sanjay raut
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी या पंतप्रधांनी केलेल्या या आरोपांबद्दल सरकारमधील लोकांनी बोललं पाहिजे, मी काही त्यांच्यावतीने बोलण्याचा ठेका घेतलेला नाही असं म्हणत राऊत यांनी माहाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय.
 
“मी महाराष्ट्र अभिमानी आहे. मी महाराष्ट्राचा नेता आहे. ही महामारी आहे. या महामारीचा उगम चीनमधून झालाय. मात्र यासंदर्भात पंतप्रधानांनी महाराष्ट्रावर केलेली टीका ऐकून मला वाईट वाटलंय,” असं राऊत आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले. पुढे बोलताना राऊत यांनी, “जागतिक आरोग्य संघटनेनं त्यात तथ्य मांडलंय. महाराष्ट्रासारख्या राज्यावर खापर फोडणं चुकीचं. जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नचं कौतुक केलंय. महाराष्ट्रातील सरकार, मुंबई महापालिका कसं काम करतेय याचं दाखले, आदर्श सर्वोच्च न्यायालयाने इतर राज्यांना दिलेत,” अशी आठवणही पंतप्रधान मोदींना करुन दिलीय.
 
जागतिक आरोग्य संघटनेनं केलेलं कौतुक, न्यायालयाने दिलेले दाखले या सर्व गोष्टींचा विचार न करता महाराष्ट्र आणि मुंबईमुळे ही महामारी पसरली असं सांगणं हे महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनतेचा लोकनियुक्त सरकारने केलेला अपमान आहे,” असं राऊत म्हणालेत. “ज्या डॉक्टर, नर्स, पारिचारिकांनी मरण पत्कारणाऱ्यांचा सुद्धा अपमान आहे. भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी पुढं येऊ=न यावर बोलायला हवं. एक महाराष्ट्राचे नेते म्हणून बोलायला हवं,” असं राऊत म्हणालेत. “मतभेद एका बाजूला आहेत. पण ठपका ठेवण्याचा जो प्रयत्न झाला. चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन प्रयत्न करण्यात आला,” असंही राऊत म्हणालेत.