शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मे 2023 (07:56 IST)

सुप्रिया सुळे अध्यक्ष होण्याची दाट शक्यता : छगन भुजबळ यांचे संकेत

chagan bhujbal
शरद पवार यांनी अध्यक्षपदाच्या निवफत्तीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.त्यामध्ये महाराष्ट्रातील राजकारण अजित पवार आणि पेंद्रातील राजकारण सुप्रिया सुळे  बघणार असल्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भविष्यातील राजकारणाचे मोठे संकेत दिले आहे. छगन भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे सर्व जनतेला सुद्धा मोठा धक्का बसला आहे.

ओबीसी, मागासवर्गीयाचे आणि आदिवासी बांधवांच्या प्रश्नांची जाण असल्याने आम्ही त्यांचा हात धरून पुढे आलो. शिवसेनेनंतर शरद पवार यांचा हात धरल्यानंतर आम्हाला अनेक फायदे झाले. आरक्षण मिळाले, मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळाले. फुले आंबेडकर यांचा आदर्श घेऊन पुढे जाणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार आहे. शरद पवार यांना आम्ही सगळे जण पुन्हा पुन्हा समजविण्याचा प्रयत्न करत आहोत. पण शरद पवार ऐकण्याच्या परिस्थितीत नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor