रविवार, 10 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 5 ऑगस्ट 2024 (12:24 IST)

98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार

आगामी 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होणार आहे. या संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार का हे पाहावे लागणार आहे. 

यंदा आगामी साहित्य संमेलनासाठी 7 ठिकाणांहून निमंत्रण प्राप्त झाली असून साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने सादर केलेल्या अहवालावर साहित्य महामंडळाच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यालयात बैठक झाली त्यात आगामी साहित्य संमेलन दिल्लीत होण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 
यंदा सात दशकांनंतर राजधानी दिल्ली येथे साहित्य संमेलन होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या पूर्वी 1954 मध्ये मराठी साहित्य संमेलन झाले होते. यंदा या वर्षी मराठी साहित्य संमेलन दिल्लीला होणार असे निर्णय घेण्यात आले आहे. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचे वैशिष्टय आहे.यंदा या संमेलनासाठी 7 ठिकाणाहून निमंत्रणे प्राप्त झाली मात्र यंदाचे संमेलन दिल्लीत व्हावे या साठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. यंदा दिल्लीत हे संमेलन सरहद या संस्थेने दिल्ली मराठी प्रतिष्ठान व दिल्लीतील अन्य मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने प्रस्ताव मांडला असून दिल्लीत संमेलन होण्यासाठी विनंती केली.की यंदा स्थळ निवड समिती तर्फे दिल्लीत संमेलन घेण्याची संधी द्यावी.त्यानंतर हे संमेलन दिल्लीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे आहे.   
 

Edited by - Priya Dixit