शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जानेवारी 2019 (17:00 IST)

दुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवंलबून राहणे लाजीरवाणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टाने सीबीआयला फटकारले आहे. दुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवंलबून राहणे हे लाजीरवाणे असल्याचं म्हणत हायकोर्टाने सीबीआयला हटकले आहे. ‘बेरोजगारांना अटक करता, पण पुरावे कुठे आहेत, असे विचारत दुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवलंबून राहणे लाजिरवाणे आहे’, असे हायकोर्टाने सीबीआयला म्हणाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी हायकोर्टाने सीबीआयला झापले. हायकोर्टाने  दाभोलकर हत्ये प्रकरणी अटक झालेल्या आरोपींविरोधात अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही, याकडे लक्ष हायकोर्टाने लक्ष वेधले. तुम्हाला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येत नाही का? बेरोजगारांना अटक करता पण पुरावे कुठे आहेत? असे प्रश्न हायकोर्टाने सीबीआयला विचारले आहेत.