शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 मार्च 2019 (09:01 IST)

आरक्षणावर न्यायालयाने राज्य सरकारला विचारले प्रश्न

court asked
अन्य मागास प्रवर्गात (ओबीसी) मराठा समाजाचा समावेश का करण्यात आला नाही? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) हा स्वतंत्र प्रवर्ग का निर्माण करण्यात आला? असे सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारले.‘राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार ओबीसी आणि एसईबीसी एकच आहेत, तर त्यांनी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण का केला? मराठा समाजाचा ओबीसीमध्येच समावेश करून, सरकारने त्यांना त्याच प्रवर्गामधून १६ टक्के आरक्षण द्यायला हवे होते. असे वर्गीकरण का केले?’ असा प्रश्न न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने केला.
 
सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील व्ही. थोरात यांनी सांगितले की, मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याच्या हेतूने सरकारने हा निर्णय घेतला. त्यामुळेच स्वतंत्र प्रवर्ग निर्माण केला. घटनेचे अनुच्छेद १५ (४) व १६ (४) अंतर्गत सरकारला मागास प्रवर्ग ओळखण्याची व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपाययोजना आखण्याचे अधिकार आहेत.