1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (09:03 IST)

राज्य सरकार भिडे गुरुजी चालवतात काय?-विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा सवाल

state government
विविध वादांत नाव आलेले संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी यांनी गुरुवारी राज्य सरकारमधले ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूर येथे भेट घेतली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे   यांनी या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
 
जे मनोहर भिडे वारंवार सांगतात की तुकाराम महाराजांपेक्षा मनु मोठा आहे, ज्या भिडेंनी तुकाराम महाराजांचा अपमान केला अशा व्यक्तीला सरकारमधील ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील भेटतात. यातूनच सरकारची मानसिकता आणि प्राथमिकता दिसून येते. भीमा-कोरेगांव प्रकरणात आरोपी म्हणून या मनोहर भिडेंचे नाव आले आहे. या सरकारने मात्र त्यांना क्लीन चिट दिली आहे. राज्यापुढे अनेक मोठ-मोठे प्रश्न आ वासून उभे असताना सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्रीच जर अशा व्यक्तीची भेट घेत असेल, तर हे सरकार भिडे चालवतात की काय असा प्रश्न उभा राहतो, अशी टीकाही मुंडे यांनी केली आहे.