मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला प्रतिसाद देत सोमवारपासून दुकान सुरु करण्याचा ठराव – संतोष मंडलेचा, अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर

market open
Last Modified सोमवार, 12 एप्रिल 2021 (09:49 IST)
ब्रेक द चेनचा निर्णयात बदल करण्याबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. मा. मुख्यमंत्री यांनी सरकार सकारात्मक असून २ दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यांच्या आश्वासनानुसार ९ तारखेला दुकान सुरु करण्याचा निर्णय स्थगित करून सोमवारपासून संपूर्ण राज्यातील व्यापार सुरळीत सुरू करण्याचा ठराव आजच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रिकल्चर तर्फे आज दि. ८ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ६ वाजता “ब्रेक द चेन व व्यापार बंद” या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी व व्यापारी सभासद यांची झूम ॲपवर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मिटिंग संपन्न झाली.

सुरुवातीला चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी सर्वांचे स्वागत करून मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक झाली त्यांनी सांगितल्याप्रमाणे २ दिवस वाट बघावी असे सांगितले आहे. याबाबत आपण सर्वांनी मते मांडावी असे सांगितले.

बैठकीत महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. ललित गांधी यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून गेल्या ४ दिवस सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत तसेच सरकारशी संपर्क करून आहोत. सर्वांच्या भुमीका मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत. तरी सर्वांनी आजच्या बैठकीत आपल्या संघटनेची भूमिका मांडावी असे सांगितले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रिकल्चर बैठकीत महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी,उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष श्री. अनिलकुमार लोढा, नाशिक शाखा चेअरमन श्री. संजय दादलीका, अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्री. विनोद कलंत्री, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष
संजय शेटे, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष राजू राठी, फतेचंद राका, चेंबर ऑफ मराठवाडा, इंडस्ट्रीज अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष श्री. कमलेश धूत , पूना मर्चन्टस चेंबर्सचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, चंद्रपूर चेंबर कॉमर्सचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन संघवी, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. अश्विन मेदांडिया, गोंदिया जिल्हा व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष रामजीवन परमार, नाशिक घाऊक व्यापारी किराणा संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, हार्डवेअर अँन्ड पेन्ट्स मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोषकुमार लोढा, येवला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. योगेश सोनवणे, श्री. मोहन गुरुनानी, नाशिक मोटार मर्चन्ट असोसिएशनचे श्री. कैलाश चावला,हर्षवर्धन संघवी, सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे नितीन वाळके, सुरेश पाटील, सांगली, संगमनेर असोसिएशनचे ओंकारनाथ भंडारी, टिम्बर फेडरेशन, जळगाव व्यापारी महासंघ, चंद्रपूर व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सदानंद खत्री, स्टील चेंबर, सिमेंट स्टोकिस्ट असोसिएशन, तुर्भे व्यापारी असोसिएशन, पालघर वसई तारापूर असोसिएशन, कॅटचे ध्येयर्शील माने, दि. सराफ असोसिएशनचे अध्यक्ष
गिरीश नवसे, इलेकट्रोनिक असोसिशनचे अध्यक्ष दीपक भुतडा, इलेक्ट्रिक असोसिएशनचे
नंदूशेठ पारख, प्लायवुड असोसिएशनचे अध्यक्ष श्री. हसमुखभाई पटेल, अंबरनाथ असोसिएशनच्या पदाधिकारीसह व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी सरकारच्या ब्रेक द चेन विषयावर सरकारच्या निर्णयाची २ दिवस वाट बघावी असे मत मांडले शेवटी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. ललित गांधी यांनी आभार मानले. बैठकीस कॅटचे उपाध्यक्ष मेहुल थोरात, श्री. अजित सुराणा, प्रवीण पगारिया, मुस्ताक शेख, महाराष्ट्र चेंबर प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे, सचिव विनी दत्ता आदीसह ३०० व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

Microsoftची मोठी घोषणा, 2025 पर्यंत बंद होईल Windows 10, ...

Microsoftची मोठी घोषणा, 2025 पर्यंत बंद होईल Windows 10, कारण काय आहे ते जाणून घ्या
Microsoftने एक मोठी घोषणा केली आहे की ते 2025 मध्ये Windows 10 साठी स्पोर्ट बंद करणार ...

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी 12 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ तर ...

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी 12 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ तर 54 केंद्रांवर मिळणार ‘कोविशील्ड’ लस
सकाळी नऊ नंतर टोकन वाटप सुरु, गर्दी न करण्याचे आवाहन

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सूचना पाठवण्याचे ...

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सूचना पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात ...

मी राष्ट्रपती नियुक्त खासदार; चंद्रकांत पाटलांनी शिकवू नये- ...

मी राष्ट्रपती नियुक्त खासदार; चंद्रकांत पाटलांनी शिकवू नये- खासदार संभाजीराजे
मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे माझी नेमणूक कोणाच्या सांगण्यावरून झालेली नाही, ...

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- अमोल ...

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- अमोल कोल्हे
खेड तालुक्यातील प्रास्तावित रेल्वे आणि रिंगरोड हे दोन्ही प्रकल्प आहेत. ठिकठिकाणी ...