गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 एप्रिल 2021 (15:53 IST)

संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेणार; अजित पवारांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

राज्यात कोरोना रुग्णाचे उद्रेक होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. शहरासह ग्रामीण भागांत करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोना रुग्णांची संख्या वाढल्याने बेड अपुरे पडत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज सर्वपक्षीय नेत्यांची महत्वाची बैठक आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.
 
मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही, असे महत्वपूर्ण वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. अजित पवारांनी बारामतीत बैठक घेऊन इंजक्शन, बेड, लसीकरण, रुग्णवाहिका याचा आढावा घेतला. बारामतीत होत असलेली वाढ रोखण्यासाठी काही निर्बंध लादण्याबद्दल पोलिस यंत्रणेला सूचना दिल्या आहेत, तसेच, आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उद्यापासून दुकाने उघडण्याच्या भूमिकेबद्दल चर्चा केली जाईल.व त्याबद्दल आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर केला जाईल, असेही अजित पवार यांनी म्हंटले आहे.