शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (21:24 IST)

उपमुख्यमंत्र्यांनी गुजरातसारख्या इतर राज्यांसाठी केंद्राच्या मदतीची मागणी केली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘तौक्ते ’ चक्रीवादळामुळे बाधित गुजरातसाठी ज्या प्रकारे 1000 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली, त्या प्रमाणे इतर राज्यांनाही मदत केली पाहिजे.
 
"चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकले, परंतु मुंबई, पालघर, ठाणे आणि कोकण जिल्ह्यातील काही भाग बाधित झाले आहेत आणि जिल्हा दंडाधिकारी व प्रभारी मंत्र्यांना या नुकसानीचे आकलन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत," असे पवार यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले. सुरुवातीच्या वेळापत्रकात पंतप्रधान  महाराष्ट्रात येऊन मुंबई दौर्‍या नंतर गुजरातला भेट देण्याची शक्यता वर्तली होती.
 
पवार म्हणाले की, परंतु शेवटच्या क्षणी पंतप्रधानांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि ते थेट गुजरातमध्ये गेले. तेथे त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तातडीने एक हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पवार म्हणाले की, “गुजरातसाठी ज्याप्रमाणे एक हजार कोटींची घोषणा केली गेली तशीच इतर राज्यांनाही मदत जाहीर करणे योग्य ठरेल. या राज्यांतील लोकांना असेही वाटेल की पंतप्रधान त्यांच्याकडे लक्ष देत आहेत.