शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

हैप्पी हायपोक्सिया म्हणजे काय, लक्षणे आणि निराकरण जाणून घ्या

सध्या कोरोनाचा उद्रेग सर्वत्र सुरूच आहे. या काळात अनेक जीवघेणे आजार देखील समोर येत आहे.कोविड ने बरे झाल्यावर इतर आजार उद्भवत आहे. या मुळे काहीच समजत नाही. कोविड पासून बरे झाल्यावर सर्वप्रथम म्यूकरमाइकोसिस नावाचा आजार समोर आला आहे. याला ब्लॅक फंगस देखील म्हणतात.आणखी एक रोग आहे जो लोकांमध्ये झपाट्याने वाढत आहे, थ्रोम्बोसिस. याला रक्ताची गुठळी असेही म्हणतात.त्याचबरोबर हॅप्पी हायपोक्सिया हा आणखी एक आजार आहे. हा एक गंभीर आजार आहे. हा आजार काय आहे? याचे काय लक्षण आहे, त्याचे उपचार कसे शक्य आहे? जाणून घेऊ या 
 
या संदर्भात वेबदुनियाने  व्याख्याता डॉ. सरिता जैन (एमडी) यांच्याशी चर्चा  केली .चला जाणून घेऊ या.
 
हैप्पी हायपॉक्सिया म्हणजे काय ?
 
रक्तातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी होते. फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही. या मुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात. या मध्ये ऑक्सिजन पातळी 50 पर्यंत पोहोचते. सामान्य ऑक्सिजनची पातळी 95 ते 100 असावी. ऑक्सिजनची पातळी कमी होण्याला हॅप्पी हायपॉक्सिया म्हणतात. 
 
 
*याची लक्षणे कोणती आहे. ?
 
* त्वचेचा रंग फिकट निळा होणे.
* घाम येणे, त्वचेचा रंग बदलणे. 
* चक्कर येणे आणि डोकेदुखी होणे.
* ओठ काळे पडणे.
* चिडचिड होणे.
 
* हॅप्पी हायपोक्सीयासाठी काय उपाय आहे?
 
हॅप्पी हायपोक्सीयाची लक्षणे दिसून येत नाही.म्हणून सावधगिरी बाळगा. शरीराच्या रंगात बदल झाल्यास त्वरितच डॉक्टरांशी संपर्क साधावा. ऑक्सिमीटरने ऑक्सिजनची पातळी तपासा आणि डॉक्टरांशी संपर्क करा. या आजाराला सायलेंट किलर म्हणून म्हटले जाते कारण या मध्ये ऑक्सिजन ची पातळी एकाएकी कमी होते. आणि रुग्ण अचानक दगावतो. घरात यावर कोणताही उपचार नाही. प्राणायाम केल्याने ऑक्सिजनची पातळी वाढते. परंतु या स्थितीमध्ये हे शक्य नाही की आपण योगा करू शकाल. आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. रक्ताच्या गुठळ्या होऊ लागतात. अशा परिस्थितीत घरात राहून उपचार करणे शक्य नसतं. 
ऑक्सिजनची  पातळी 90 पेक्षा कमी  होते. आणि आपल्याला मशीनद्वारे ऑक्सिजन द्यावे लागते.
 
 
या रोगाचा कोविड शी काय संबंध आहे? 
 
हा रोग कोविडशी संबंधित आहे. कोविड रूग्णामध्ये सर्वप्रथम ऑक्सिजनची पातळी कमी होते.हा एक प्रकारचा सायलेंट किलर आहे.सुरुवातीच्या काळात हा आजार समजून येत नाही. लक्षण देखील स्पष्ट दिसत नाही. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर ज्येष्ठांना याची जाणीव होते. 
तरुणांची प्रतिकारशक्ती चांगली असते. म्हणून ऑक्सिजन पातळी 90 किंवा त्यापेक्षा कमी झाल्यावर देखील समजून येत नाही. नंतर शरीरातील इतर अवयव निकामी होऊ लागतात आणि ते रुग्ण मृत्युमुखी होतात. याचे मुख्य कारण हॅप्पी हायपॉक्सिया आहे. 
 
* ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर काय धोका असतो  ?
शरीरात ऑक्सिजन ची पातळी कमी झाल्यावर हृदयविकाराचा धोका वाढतो.