आरोग्यासाठी वरदान आहे टोमॅटो, फायदे जाणून घ्या
टोमॅटो जगातील सर्वाधिक वापरल्या जाणार्या भाज्यांपैकी एक आहे, भारतीय स्वयंपाकात टोमॅटोचा प्रमुख वापर केला जातो. त्याशिवाय कोशिंबीर, सूप, भाज्या, लोणचे, चटणी, कॅचअप इत्यादींमध्ये देखील याचा वापर केला जातो. टोमॅटो शिवाय स्वयंपाकाचा विचार करणे शक्य नाही. टोमॅटोमध्ये बरेच फायदेशीर घटक असतात जे याला रोग बरे करण्यास सक्षम बनवतात.
चला, जाणून घ्या टोमॅटो आरोग्यासाठी वरदान का आहेत -
1 टोमॅटोमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. ऍसिडिटीची समस्या उद्भवल्यास टोमॅटोचे सेवन वाढविल्याने या समस्येपासून मुक्तता होते.
2 टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन 'ए' आढळतं.हे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतं.
3 टोमॅटो खाल्ल्याने पचनशक्ती वाढते आणि गॅसची समस्या देखील दूर होते.
4 डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार टोमॅटोचे नियमित सेवन केल्याने श्वसनमार्ग स्वच्छ राहतो आणि खोकला,कफ बरा होतो.
5 मुलांना मुडदूसरोग झाला असल्यास टोमॅटोचा रस दिल्याने फायदा होतो. तसेच हे जलद गतीने मुलांचा विकास करतो.
6 गरोदर स्त्रियांसाठी देखील सकाळी एक ग्लास टोमॅटोच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर असतं.
7 मधुमेह आणि हृदयरोगाच्या रुग्णांच्या आरोग्यासाठी टोमॅटो उपयुक्त आहे.
8 टोमॅटोचे सेवन केल्याने कर्करोगाच्या रुग्णांनाही फायदा होतो. तसेच कफ आणि पोट साफ होण्यासही मदत होते.
9 पोटात जंत असल्यास, सकाळी अनोश्यापोटी टोमॅटो मध्ये काळीमिरपूड लावून खावे. असं केल्याने पोटातील जंत मरून बाहेर पडतात.
10 टोमॅटोच्या गर मध्ये कच्च दूध आणि लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर चमक येते.