सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (17:21 IST)

कॅव्हिडच्या लसीकरणा नंतर या 5 गोष्टी लक्षात ठेवा

कोरोना विषाणूचा धोका अद्याप कमी झालेला नाही. कोरोना लसीकरण मोहीम भारतात मोठ्या प्रमाणात राबविली जात असली तरी कोरोनाविरूद्ध अजूनही युद्ध सुरू आहे. बरेच लोक याबद्दल सर्व प्रकारच्या खबरदारी घेत आहेत. पण कोविड पासून वाचता येत नाही.  कोरोनाची लस हळूहळू सर्व वयोगटांना उपलब्ध केली जात आहे. परंतु बरेच लोक लसीकरणानंतर फिरत आहेत, जे अतिशय चुकीचे आहे.
लसीकरणानंतर काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊ या .
 
1 लसीकरणानंतर अर्धा तास रुग्णालयातच थांबा.अस्वस्थता जाणवल्यावर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
 
2 लसीकरणानंतर थोडी वेदना, ताप आल्यास घाबरू नका. थंडी वाजून ताप येत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
 
3 तज्ञांच्या मते, निरोगी माणसावर या लसीचा परिणाम जलदगतीने प्रभाव पाडत आहे.
 
4 लसीकरणानंतर, बरेच लोक मोकाट पक्ष्यांप्रमाणे फिरत आहे. अशी चूक करू नका. लसीकरणानंतर देखील हात स्वच्छ धुवावे,मास्क लावावे,सामाजिक अंतर राखावे. कोरोना अद्याप संपलेला नाही हे विसरू नये.
 
5 बरेच लोक लसीकरणानंतर मद्यपान करत आहे असं करू नये. तज्ञांच्या मते, सुमारे 45 दिवस मद्यपान करू नये.