1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (08:45 IST)

वारंवार ढेकर येण्याचे 5 कारणे जाणून घ्या

Here are 5 common causes of belching health care tips in marathi
जेवणानंतर ढेकर देणे हा पचनाशी संबंधित असतो, परंतु वारंवार   कोणत्याही विशिष्ट कारणास्तव ढेकर देणे चिंताजनक ठरू शकते. पचन व्यतिरिक्त, अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे वारंवार किंवा अत्यधिक ढेकर येऊ शकतं. जाणून घ्या -
 
1 बऱ्याच वेळा आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे देखील ढेकर येतात. तेलकट,भाजके खाद्य पदार्थ, कोल्ड्रिंक्स, फुलकोबी, बीन्स,ब्रोकोली खाऊन पोटात गॅस होते हे ढेकर येण्यास कारणीभूत असू शकतं.या गोष्टींना रात्री खाऊ नये. 
 
2 बऱ्याच काळापासून बद्धकोष्ठतेची समस्या येणे हे देखील जास्त ढेकर येण्याचे एक प्रमुख कारण आहे. या प्रकरणात आपल्याला प्रथम बद्धकोष्ठते वर उपचार घेणे आवश्यक आहे.
 
3 वारंवार ढेकर येण्याचे मुख्य कारण आहे अपचन. जर आपण घेतलेले अन्न पचत नसेल तर ही सामान्य बाब आहे. 
 
4 बऱ्याच वेळा छोट्या छोट्या कारणामुळे पोटात गॅस होतात , जसे की ग्लासाने पाणी पिण्याच्या ऐवजी वरून पाणी पिणे,जेवताना बोलणे, च्युईंगम खाल्ल्याने पोटात जाउन गॅस बनवतात. याला एरोफेस म्हणतात.  
 
5 गॅस मुळे पचन प्रणाली विस्कळीत होते,तर एच. पायलरी नावाच्या जिवाणूमुळे पेप्टिक अल्सर चा त्रास उद्भवतो. जे ढेकर येण्यासह पोट दुखी चे कारण होऊ शकते.