शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (22:15 IST)

गव्हाचे 5 औषधीय गुणधर्म जाणून घ्या

गहू केवळ एक शक्तिशाली धान्यच नाही तर एक अतिशय उपयुक्त औषध देखील आहे. याचे  5 उत्तम फायदे आपल्याला माहित नसतील. परंतु आपल्याला गव्हाचे जादुई औषधी गुणधर्म माहित असले पाहिजेत चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 खोकला - 20 ग्रॅम गव्हाच्या दाण्यात मीठ मिसळा आणि 250 ग्रॅम पाण्यात उकळा. जोपर्यंत पाण्याचे प्रमाण एक तृतीयांश होणार नाही. आता हे पाणी गरम गरम प्या. एक आठवडा हा प्रयोग  वारंवार केल्याने खोकला लवकर बरा होतो.
 
2 स्मरणशक्ती - गव्हा पासून बनवलेल्या सत्वात साखर आणि बदाम मिसळून प्यायल्याने स्मरणशक्ती वाढते. यासह, हे मानसिक दुर्बलता दूर करण्यात देखील अत्यंत उपयुक्त सिद्ध होते.
 
3 खाज येणे- गव्हाचं पीठ मळून त्वचेची जळजळ,खाज येणे, उकळणे, भाजणे,या वर लावल्याने थंडावा मिळतो. या व्यतिरिक्त जर एखाद्या विषारी कीटक चावला असेल तर गव्हाच्या पिठामध्ये व्हिनेगर मिसळून ते कीटक चावलेल्या जागी लावल्यास फायदा होतो.
 
4 पथरी- पथरी झाली असेल तर गहू आणि हरभरे पाण्यात उकळवून ते पाणी रुग्णाला काही दिवस प्यायला द्या. असं केल्याने  
मूत्राशय आणि किडनीचा दगड गळून बाहेर पडतो. 
 
5  हाडांचे फ्रॅक्चर - या प्रकरणात, गव्हाचे काही दाणे तव्यावर  भाजून घ्यावे. त्यात मध मिसळून काही दिवस चाटण घेतल्याने  हाडांचा फ्रॅक्चर दूर होतो.