सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

तुपाचे आश्चर्यकारक 5 फायदे जाणून घ्या

तुपाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, हे आपल्याला माहित असेलच, परंतु आरोग्याबरोबरच आपल्याला तूपाचे  सौंदर्याचे हे 5 फायदे मिळू शकतात. तुपाचे हे 5 मोठे फायदे जाणून आश्चर्य होईल. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 एक चमचा साजूक तूप, एक चमचा पिठी साखर,एक चतुर्थाश चमचा काळी मिरपूड  तिन्ही मिसळून सकाळी अनोश्या पोटी आणि रात्री झोपताना चाटण घ्यावे आणि कोमट गोड दूध प्यावे. असं केल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते. 
 
2 एका मोठ्या भांड्यात 100 ग्रॅम साजूक तूप घ्या, त्यात पाणी घाला आणि हलक्या हाताने फेणून द्या. त्यातील पाणी फेकून द्या. अशा  प्रकारे तूप एकदा धुतले गेले. असे तूप 10 वेळा पाण्याने धुवा, वाटी थोडा काळ तिरकी ठेवा, म्हणजे जर त्यात जास्त पाणी शिल्लक असेल तर ते देखील बाहेर येईल. आता त्यात थोड्या प्रमाणात कापूर घालून मिक्स करावे आणि रुंद तोंडाच्या बाटलीत भरा. हे तूप, खाज,खरूज, मुरुम, उकळणे  सारख्या त्वचेच्या आजारासाठी हे उत्तम औषध आहे.
 
3 रात्री झोपेच्या वेळी  एक ग्लास गोड दुधात 1 चमचा तूप घालून प्यायल्याने शरीराचा कोरडेपणा आणि अशक्तपणा दूर होतो,  झोप छान लागते, हाड मजबूत होतात आणि सकाळी शौच साफ होते. हिवाळ्याचा हंगामच्या सुरु होण्यापूर्वी आणि संपताना हे प्रयोग केल्याने शरीराचे सामर्थ्य वाढत आणि शारीरिक दुर्बलता दूर होते.
 
4 तूप, सालीसकट दळलेले काळे हरभरे आणि बारीक साखर हे तिन्ही समप्रमाणात मिसळून लाडू बांधून घ्या आणि  दररोज सकाळी अनोश्यापोटी हे लाडू चावून चावून एक ग्लास कोमट गोड दुधासह घेतल्याने स्त्रियांच्या आजारात आराम मिळते आणि पुरुषांचे स्थूल शरीर मजबूत होऊन सडपातळ होतं.
 
5 हरभरे आणि 11 किलो गहू दळवून घ्या. हे गव्हाचं पीठ चाळून  न घेताच वापरा. 250 ग्राम गव्हाच्या पिठात तुपाचे मोयन घालून त्यात कोणतीही आवडती भाजी बारीक चिरून घाला, थोडं,मीठ,ओवा,आणि बारीक चिरलेला कांदा घालून कणिक मळून घ्या. याच्या जाड जाड पोळ्या तव्यावर घालून शेका याला सूरी टोचून त्यात तूप सोडा आणि भरपूर तुपासह चावून चावून भाजी किंवा गुळा सह खा.  ही पोळी खूप पौष्टिक आहे, याचे कारण ती साजूक तुपाने बनलेली आहे