बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जून 2022 (22:08 IST)

सरकारच्या अहंकाराचं हरण या निवडणुकीत होईल-सुधीर मुनगंटीवार

sudhir mungantiwar
भाजप आमदारांचे खडसेंशी संबंध असतील, पण मतं मिळणे अवघड आहे. अपक्षांकडून सहकार्याचं आश्वासन दिल्याने पाचवा उमेदवार दिला आहे. आम्ही पूर्ण शक्तीने लढलो. जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मविआला विधान परिषदेतही धक्का मिळणार असे मतं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.आज विधानसभेतून ते बोलत होते.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, कुणाच्याही नाराजीच्या जोरावर सत्तेत येण्याच्या भ्रमात आम्ही नाही. सरकारच्या अहंकाराचं हरण या निवडणुकीत होईल. मविआ सरकारला राज्यसभेत जसा धक्का दिला आहे तसाचं धक्का विधानपरिषदेत द्यावा अशी सूचना नाराज आमदारांनी केली आहे. याच आश्वासनावर भाजपने ५ वा उमेदवार उभा केला आहे. आम्हाला विश्वास आहे राज्यसभेप्रमाणे या ही निवडणूकीत आमचे उमेदवार विजयी होतील. विकासाच्या शत्रू संघे युध्द आमचे सुरु ही भावना घेऊन आम्ही काम करत आहोत.
 
राष्ट्रवादीतील नाराजीचा फायदा घेवून आम्ही सत्तेत येईल असा विचार आम्ही करत नाही. मात्र या नाराजीतून सरकार चालवणाऱ्या नेत्यांनी सुधारणा करावी असा सल्ला त्यांनी दिला. जनतेचे प्रश्न प्रलंबित असताना पूर्ण अडीज वर्षात फक्त दारु संदर्भात निर्णय घेण्यात आला. अशा सरकारचा माज उतरला पाहिजे. सरकारच्या अहंकाराचं हरण झालं पाहिजे हि या निवडणूकीची भूमिका असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.