शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (14:07 IST)

सरकारी नोकरीची नामी संधी; पगार मिळेल लाखांपेक्षा जास्त

govt jobs
सध्याच्या काळात अनेक शासकीय निमशासकीय किंवा केंद्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थांमध्येही काम करण्याची तरुणांना मोठी संधी प्राप्त झाली आहे . त्यातच भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची मोठी संधी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या पदांवर कनिष्ठ कार्यकारी, हवाई वाहतूक नियंत्रण या पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट aai.aero वर जाऊन अर्ज करू शकता.
 
भारतीय विमानपत्तन प्राधिकरण ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून तिचे काम विमानतळ बांधणी आणि देखरेख आणि हवाई वाहतूक नियंत्रण हे आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण या सार्वजनिक उद्योग क्षेत्र स्थापना इ.स. १९९४ मध्ये झाली असून त्याचे मुख्यालय राजीव गांधी भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली येथे आहे. हवाई वाहतूक नियंत्रण क्षेत्रात कर्मचारी सुमारे २५,००० विविध पदांवर कार्यरत आहेत .
 
जाहीरातीनुसार पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 15 जून 2022 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2022 पर्यंत चालेल. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 400 हून अधिक पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.
 
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 15 जून 2022ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2022शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून भौतिकशास्त्र आणि गणितासह B.Sc किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला 10+2 स्तरावर बोलले आणि लिहिल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेचे किमान प्रवीणता असणे आवश्यक आहे.
 
एकूण जागा : ४००पदाचे नाव : कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल)वयाची अट: 14 जुलै 2022 रोजी 27 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : १०००/- रुपये [SC/ST/महिला – ८१/- रुपये]पगार (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये.नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतअर्ज पद्धती : ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2022अधिकृत संकेतस्थळ : www.aai.aero