शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (07:17 IST)

रेल्वे पोलिस असलेल्या बापाने पोटच्या बालकाला पट्ट्याने केली अमानुष मारहाण

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी व रेल्वे पोलिस असलेल्या बापाने आपल्या पोटच्या बालकाला पट्ट्याने मारहाण केली आहे.  हा प्रकार या रेल्वे पोलिसाने दुस-या पत्नीच्या मदतीने केला आहे. राहुल विजय मोरे या निष्ठूर बापाने आपल्या पाच आणि आठ वर्षांच्या मुलांना प्रचंड मारहाण केली आहे. पाच वर्षांच्या प्रियांशू या मुलीच्या हाताला चटके दिले तर आठ वर्षांच्या हिमांशू या मुलाला लाकडाने मारहाण केली आहे. 
 
या घटनेत राहुल मोरे हा रेल्वे पोलिसात नोकरीला आहे. या मुलांची आई जिवंत नाही. आई गेल्यावर ही मुलं त्यांच्या आजीकडे राहायला गेली. पण गेल्या दोन महिन्यांपासून ही मुलं बापाकडे राहायला गेल्यावर या मुलांचे बाप आणि सावत्र आईने प्रचंड हाल सुरू केले. या दोन मुलांचा होणारा शारीरिक छळ शेजारच्यांच्या लक्षात आल्याने चिडलेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली.
 
इगतपुरी पोलिसांनी या दोन्ही मुलांची सुटका केली आहे. या दोघांना आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची मावशी आणि मावस आजी या दोन्ही मुलांची काळजी घेत आहे.