1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 मार्च 2023 (21:27 IST)

आव्हाड यांना मिळालेल्या धमकीचा तपास सीआयडीकडे वर्ग

devendra jitendra
आमदार जितेंद्र आव्हाड यांना मिळालेल्या धमकीचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. यासाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. याचा सखोल तपास केला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
 
जितेंद्र आव्हाड यांनी एका अधिकाऱ्याचा विषय सभागृहात मांडला. त्याची दखल आम्ही घेतलेली आहे. आव्हाड व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा दिली जाईल. लोकप्रतिनिधींना अशी धमकी दिली जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. आव्हाड यांची मुलगी आमच्याही मुलीसारखी आहे. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली.
 
मात्र महेश आहेर यांची किमान बदली करावी. कारण त्यांच्या कार्यालयात ते पैसै मोजत असल्याचा व्हिडीओ आहे. त्याने काही अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत. त्यामुळे याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यावर फडणवीस म्हणाले, सध्या तरी हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्याची आवश्यकता नाही. पण सीआयडीच्या तपासात काही तथ्य आढळल्यास याचा तपास निश्चित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग केला जाईल.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor