सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 मार्च 2023 (17:16 IST)

गोबर गॅस मध्ये गुदमरून चौघांचा दुर्देवी मृत्यू

बारामती तालुक्यातील खांडज गावाजवळील 22फाटा जवळ कचरा आणि शेण साचलेल्या जुन्याकाळातील मेणवलीत गोबर गॅस स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या 4 शेतकरी मजुरांचा गोबर गॅस मध्ये गुदमरून दुर्देवी मृत्यू झाला.मयत चौघांमध्ये बापलेकाचा समावेश आहे. 

मिळालेल्या खांडज येथे 22 फाटा जवळ जुन्याकाळातील मेणवली आहे. या मेणवलीत साचलेला शेण आणि कचरा  स्वच्छ करण्यासाठी गेलेले शेतमजूर बाबुराव गव्हाणे हे अडकले त्यांना काढण्यासाठी गेलेले प्रकाश आटोळे, भानुदास आटोळे यांचा मुलगा प्रवीण आटोळे आणि बाबुराव गाजवणे यांचा मेणवलीत गोबर गॅस तयार होऊन त्यात गुदमरून मृत्यू झाला. भानुदास आटोळे आणि प्रकाश आटोळे हे बाप लेवक होते.घटनेची माहिती मिळतातच तातडीनं त्यांना बाहेर काढले त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.   

Edited By - Priya Dixit