शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (08:09 IST)

‘पब्जी’च्या आहारी गेलेल्या तरुणीने संपविले जीवन, सुसाईड नोटमध्ये लिहिले कारण

जामनेर येथील महाविद्यालयात 12 वीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीनेसायंकाळी सातच्या सुमारास गळफास घेत आपले जीवन संपविल्याची दुर्दावी घटना घडली आहे. तिला मोबाईलवर पब्जी गेम खेळण्याचा नाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. पब्जीच्या  नादात तरुणीने आत्महत्या केल्याने जामनेर शहरात  खळबळ उडाली आहे. दरम्यान, तीने लिहून ठेवलेली सुसाईड नोट (पोलिसांना मिळाली आहे.
 
नम्रता पद्माकर खोडके  (वय-20, रा. जामनेर, मुळ रा. भराडी, ता. जामनेर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.पब्जी खेळाच्या नादात एका स्टेपवर येऊन आत्महत्या केली. नम्रताचे वडिल खासगी स्थानिक डॉक्टरांकडे सहाय्यक डॉक्टर  म्हणून काम पाहतात. तरुण मुलीने आत्महत्या केल्याने आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

खोडके यांचे वाकी रोडवर घराचे काम सुरु आहे. बांधकामावर पाणी मारण्यासाठी आई गेली होती. आई गेल्यानंतर नम्रताने घराच्या स्लॅबला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. नम्रता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात द्वितीय वर्ष बीसीए  या वर्गात शिकत होती. आई घरी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नम्रताने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला. आपल्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरु नये असे तिने सुसाईड नोटमध्ये इंग्रजीत लिहिले आहे.जप्त केलेला मोबाईल फेस लॉक असल्याने पोलिसांनी तिच्या चेहऱ्यासमोर नेत तो उघढला.मोबाईलमध्ये पब्जी गेम संबंधीत स्क्रिनशॉट मिळाले.