सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (16:00 IST)

मोलकरणीच्या मुलगा शिकणार परदेशात

सोलापूर जिल्ह्यातील कृर्डुवाडी मधील घरगुती काम करून आपल्या कुटुंबीयांचं उदरनिर्वाह करणाऱ्या एका गरीब महिलेचा मुलगा परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषात बदल केल्यावर लंडन शिकायला जाणार आहे.या साठी त्याने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहे.लोकांच्या घरात काम करणाऱ्या या महिलेचा हुशार मुलगा योगेश बडेकर लंडन मधील इम्पेरिकल कॉलेज मध्ये इन्व्हायर्मेंटल इंजिनियरिंग मध्ये मास्टर्स करण्यासाठी लंडन जात आहे. शिष्यवृत्तीच्या बळावर त्याने आपले शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न घेऊन लंडन पुढील शिक्षणासाठी जात आहे.
 
सामाजिक आणि न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषात काही बदल केल्याने या योजनेचा कोटा प्रथमच पूर्णपणे म्हणजे 100 टक्के भरला. या शिष्यवृत्ती योजने अंतर्गत योगेश बडेकर हा विद्यार्थी लंडन मास्टर्स करण्यासाठी जात आहे.योगेश लहान असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले.3 बहिणी आणि योगेश असा चोघांना त्याच्या आईने लोकांच्या घरात काम करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला. योगेश ने आपल्या कवितेतून धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहे.
 
योगेशची धनंजय मुंडेंसाठी खास कविता
 
'मोलकरणीचा मुलगा निघाला शिकाया आज लंडनला।
नाही लागणार आईला आता दुसऱ्याची घरं झाडायला।।
कारण आपल्या खात्याने पाठवलं मला पुढं शिकायला।
शतशः आभार या आपल्या खाते समाजकल्याणला।।
राहील ऋणी मी सदा या आपल्या कार्याला, या आपल्या कार्याला।।