शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (08:26 IST)

मुंबईतून बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलाचे प्रमाण मोठे

२०१३ सालापासून मुंबईतून एकूण २६,७०८ मुली आणि महिला बेपत्ता झाल्या होत्या. यात ५,०५६ अल्पवयीन मुली आहेत. बेपत्ता झालेल्या मुली आणि महिलांपैकी २४,४४४ जणींचा शोध लागला. पण २,२६४ जणी अद्यापही बेपत्ता आहेत विधानसभेमध्ये भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा आणि अन्य आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
 
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतून बेपत्ता झालेल्या ५,०५६ अल्पवयीन मुलींपैकी ४,७५८ मुली सापडल्या तर २९८ मुलींचा शोध अजूनही सुरु आहे. या अल्पवयीन मुलींपैकी काही मुलींचे अपहरण झाले. त्याचप्रमाणे बेपत्ता असलेल्या २१,६५२ महिलांपैकी १९,६८६ महिला सापडल्या. १,९६६ जणींचा शोध अजूनही सुरु आहे.