गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (16:30 IST)

हे काय नवीन, सांगली, मिरज शहरात वटवाघळांची संख्या वाढली

सांगली, मिरज शहरात वटवाघळांची संख्या वाढली आहे. आता सर्रास शहरातील झाडांना लटकलेली दिसू लागली आहेत. सांगलीतील आयर्विन ब्रिज जवळ आणि मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानमधील झाडांवर या वटवाघळांनी आपल ठाण मांडले आहे. एकेका झाडाला शेकडोंच्या संख्येने ही वटवाघळे लटकलेली दिसून येत आहेत. तसेच सांगली शहरापासून जवळ असलेल्या बुधगावमध्येही वटवाघळे आढळून आली आहेत. 
 
मिरजेलगत आणि कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या अर्जुनवाड येथेही वटवाघळांची संख्या मोठी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ सालात आलेल्या महापूरामुळे अर्जुनवाड येथील वटवाघळांनी आपला मोर्चा मिरजेकडे वळविला असून आता त्यांनी उद्यानातील झाडावर ठाण मांडले आहे.