सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सांगली , शनिवार, 2 जुलै 2022 (08:00 IST)

मुलीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं आई- वडिलांनी जीवन संपवले

मुलीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं आई- वडिलांनी जीवन संपवले. ही घटना सांगली जिल्ह्यातील राजेवाडी येथे घडली.वडिल करण हेगडे (वय- 28), तर आई शीतल हेगडे (वय- 22) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.चार दिवसापूर्वी हेगडे दाम्पत्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. गळ्यामध्ये खाऊचा पदार्थ अडकल्याने हा मृत्यू झाला होता. डोळ्यादेखेत झालेला मुलीचा मृत्यू पाहून हे दोघे दु:खी झाले होते. या विरहातूनच त्यांनी जीवनयात्रा संपवली. घटनास्थळी एक चिट्टी सापडल्य़ाची माहिती समोर आली आहे.
 
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेवाडी येथील करण हेगडे यांच्या दोन वर्षाच्या मुलीचा चार दिवसापूर्वी गळ्यामध्ये खाऊचा पदार्थ अडकून मृत्यू झाला होता. मुलीच्या मृत्यूवेळी झालेली तिची तडफड पाहून पती-पत्नी अत्यंत दुखी होते. मुलीच्या अकाली मृत्यूमुळे आई-वडिलांनी गावातीलचं कानबुनाथ मंदिरच्या समोर पिंपरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती राजेवाडीचे पोलीस पाटील यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून, त्या चिठ्ठी मध्ये मुलीच्या विरहामुळे व्यतीत होऊन आम्ही आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे.