बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जानेवारी 2022 (14:49 IST)

दारूची होम डिलिव्हरी ऑनलाइन करण्याचे धोरण आखले होते, ते काय होते?

वाईन विक्रीच्या मुद्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही यावरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शनिवारी भाजपावर टीकास्त्र डागलं आहे. यावेळी त्यांनी तत्कालीन फडणवीस सरकारच्या धोरणाची आठवण करून देत भाजपावर टीका केली आहे. फडणवीस सरकारने दारूची होम डिलिव्हरी ऑनलाइन करण्याचे धोरण आखले होते, ते काय होते? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच, भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, दारू हे औषध आहे आणि ते कमी प्रमाणात प्या, असे सांगत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.