रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (21:45 IST)

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षालाही वाटा हवा -रामदास आठवले

ramdas adthavale
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी रामदास आठवले यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षालाही वाटा देण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांकडे केली. याबाबत स्वत: ट्विट करत रामदास आठवले यांनी माहिती दिली.
रामदास आठवले ट्विट करत म्हणाले की, महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सागर  बंगला येथे सदिच्छा भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.