याच आठवड्यात लागणार राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल; घटनापीठाने केले जाहीर
सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्त्वाची सुनावणी सुरु आहे. यासंदर्भात न्यायालयाने ही सुनावणी याच आठवड्यामध्ये संपणार असल्याची माहिती घटनापीठाने दिली आहे. त्यामुळे गेल्या ८ महिन्यांपासून सुरु असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष लवकरच संपेल अशी अशा असून हा निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सुनावणी सुरु असताना सरन्यायाधीश म्हणाले की, दोन्ही गटांनी परवापर्यंत आपला युक्तिवाद संपवावा. कारण, याच आठवड्यामध्ये हे प्रकरण संपवायचे आहे. यामुळे बुधवारी संध्याकाळपर्यंत शिंदे गटाचे वकील नीरज कौल आणि मनिंदर सिंग बाजू मांडणार आहेत. तर गुरुवारी दुपारपर्यंत सॉलिसिटर जनरल हरिष साळवी राज्यपालांच्या बाजूने युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर शेवटचे २ तास पुन्हा ठाकरे गटाचे वकील बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आता कोणाच्या बाजूने निकाल लागणार हे लवकरच कळणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor