शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (19:47 IST)

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु,हवामान खात्यानं माहिती दिली

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला आजपासून सुरुवात झाली आहे.मान्सूनचा परतीचा हा प्रवास राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून आलेला आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राजस्थान, गुजरातचा काही भाग, दिल्ली, चंदीगड, पंजाब, लडाख, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर,हिमाचल प्रदेश,मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही भाग मान्सूनच्या प्रवासाच्या परतीसाठी अनुकूल असल्याचे हवामान खात्यानं म्हटले आहे.
 
या दरम्यान 5 ऑक्टोबरपासून पुढील 4 ते 5 दिवस राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान खात्यानं वर्तवली असल्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील झाला.
 
मान्सूनच्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाल्यावर वातावरणातील आद्रता हळू-हळू कमी झाली आहे.त्यामुळे हा प्रवास पुढील टप्प्यातून संपायला काहीच वेळ लागत नाही.15 ऑक्टोबर पर्यन्त पाऊस देशातून परत जातो.यंदाच्या वर्षी देखील पावसाचा हा प्रवास वायव्य दिशेने सुरु होऊन वेळीच संपण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.