बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (17:50 IST)

दुर्देवी !अल्पवयीन मुलाच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू

अल्पवयीन मुलाचा अंगावर वीज कोसळून जागीच त्यांचा दारुण अंत झाल्याची दुर्देवी घटना वडगाव मावळ येथे झाली.राज भरत देशमुख(14)असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,राज बुधवारी बैलपोळा असल्याने बैल आणण्यासाठी गेला असताना वीज कोसळली आणि ही वीज राजच्या अंगावरच पडली. वीज पडल्याचा आवाज आला आणि राजचे वडील त्या आवाजाच्या दिशेने गेले तेव्हा त्यांना खंडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली त्यांनी राजचे मृतदेह बघितले. त्याचे केस जळाले होते आणि नाकातून आणि कानातून रक्त येत होते. पोलिसांना माहिती मिळतातच ते घटनास्थळी पोहोचले आणि राजवर वीज पडल्याचे समजले त्यांनी तातडीने राजला रुग्णालयात नेले .डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले.पोलिसांनी पंचनामा केला आहे. डॉक्टरांनी शवविच्छेदनाचा अहवाल ठेवला आहे.तो आल्यावर राजच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने 4 लाख रुपये देण्यात येतील असं नायब तहसीलदार यांनी सांगितले आहे. मावळ तालुक्यात बैलपोळा भाद्रपद अमावस्याला साजरा करतात.त्यासाठी बैल आणण्यासाठीच राज बाजारात गेला असतांनाच ही दुर्देवी घटना घडली.