रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (18:46 IST)

रस्ते अपघात :बस आणि ट्रक च्या अपघातात बस आणि ट्रक जळून खाक

अकोला ते बाळापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर शेळद फाट्या जवळ एका भयंकर रस्ते अपघातात एस टी महामंडळाची बस आणि ट्रक मध्ये धडक झाल्यामुळे बस आणि ट्रक ने पेट घेतला आणि दोन्ही वाहने जळून खाक झाले. या मध्ये 12 प्रवाशी गंभीर रित्या जखमी झाले आहे.अद्याप कोणत्याही जीवित हानी झाल्याची माहिती मिळाली नाही. 
 
राष्ट्रीय महामार्गावरील शेळद फाट्याजवळ झालेल्या अपघातात बस आणि ट्रक मध्ये झालेली धडक एवढी जोरदार होती की बस आणि ट्र्क दोघांनी पेट घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. या मध्ये 12 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 
 
या घटनेची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे बंब आणि पोलीस वेळीच आले तो पर्यंत वाहने जाळून खाक झाली होती.