बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (19:03 IST)

Maharashtra Bandh:लखीमपूर खिरी हिंसाचाराच्या घटनेविरोधात महा विकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली

महाराष्ट्र बंद: 11 ऑक्टोबर रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने लखीमपूर खिरी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. राज्यातील तीनही पक्षांची युतीची महाविकास आघाडी सरकार आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेश लखीमपूरमधील शेतकऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणारा ठराव मंजूर केला. हा प्रस्ताव राष्ट्रवादी जयंत पाटील यांनी मांडला आणि त्याला काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी पाठिंबा दिला.
 
महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले, "लखीमपूर खिरी  हिंसाचाराच्या घटनेविरोधात महा विकास आघाडी सरकारने (राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना युती) ने 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे."