1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (21:42 IST)

यंदा परतीच्या पावसाला विलंब होईल, हवामान खात्याने वर्तवली शक्यता

The return rains will be delayed this year
राज्यभरात समाधानकारक हजेरी लावलेल्या पावसाचा परतीचा प्रवास यंदा लांबण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पण यानंतर ऑगस्ट महिन्यात कमी पावसाची नोंद झाली.  मात्र, आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. त्यामुळे यंदा परतीच्या पावसाला विलंब होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
 
हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 10 आणि 11 सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर 12 सप्टेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नंदुरबार, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस वाढण्याची शक्यता असून, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.