शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 एप्रिल 2021 (16:31 IST)

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस

कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात येत आहे. 14 ते 18 एप्रिल दरम्यान महापालिकेच्या आठ केंद्रांवर भारत बायोटेकने बनविलेल्या ‘कोव्हॅक्सिन’च्या लसीचा दुसरा डोस  देण्यात येणार आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसरा डोस घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
 
पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या आणि दुस-या टप्प्यात वैद्यकिय क्षेत्रातील लोकांना, फ्रंटर वर्कर यांना लस देण्यात आली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मार्च पासून सुरु झाला आहे. या टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना  कोरोना लस टोचण्यात आली. 1 एप्रिलपासून 45 वर्षांपुढील सर्वांना  लस दिली जात आहे. कोरोना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो.
 
महापालिकेच्या आठ केंद्रांवर मिळणार लसीचा दुसरा डोस !
 
आय हॉस्पिटल मसुळकर कॉलनी आणि वायसीएमएच, जुन्या भोसरी रुग्णालयाजवळील सावित्रीबाई फुले शाळा,  तालेरा हॉस्पिटल, चिंचवड,  ईएसआयएस हॉस्पिटल, मोहनहर, चिंचवड, यमुनानगर पीसीएमसी रुग्णालय यमुनानगर,  पिंपळेगुरव येथील महापालिका रुग्णालयाजवळील पीसीएमसी शाळा,  पिंपळेनिलख दवाखाना, आणि पिंपरीतील नवीन जिजामाता हॉस्पिटल येथे आजपासून लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.