महाराष्ट्र निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला
दोन दिवसांपासून सुरू असलेला महाराष्ट्र निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपकरी निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने मागण्यांबाबत चर्चा केली. या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, निवासी डॉक्टरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.
वसतिगृहासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनापूर्वी मला भेटा असेही मी त्यांना सांगितले होते, बैठक आधी झाली असती तर हा प्रश्न निर्माण झाला नसता, असेही गिरीश महाजन म्हणाले. निवासी डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ.अविनाश दहिफळे यांनी सांगितले की, आज आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. आम्ही संप मागे घेत आहोत. निवासी डॉक्टरांचा संप आता मागे घेण्यात आला आहे. आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor