बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (15:52 IST)

औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर ‘द बर्निंग बस’चा थरार

औरंगाबाद : अहमदनगर महामार्गावर ‘द बर्निंग बसला’ आज (दि. २१) सकाळी भीषण आग लागली आहे. औरंगाबादकडून नगरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या बसला भीषण आगली होती.
 
औरंगाबाद शहरातील नगर नाक्याजवळ खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या बसला आग लागली होती. ही बस नागपूर येथून आली होती. हिमालया ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस आहे. तसेच, शहरातील बाबा पेट्रोलपंपावर प्रवासी उतरल्यानंतर डिझेल भरायला जात होती. त्याचवेळी आग लागली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र आग भीषण असल्यामुळे आटोक्यात येत नव्हती. बसला लागलेली आग एवढी भीषण होती की, धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरले होते. मात्र अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते.
 
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटना घडली त्यावेळी बसमध्ये प्रवासी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आगीत बसचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीमध्ये अर्ध्याहून जास्त बस जळून खाक झाली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor