1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2022 (07:51 IST)

'वेळ जवळ आलीय...',गिरीश महाजनांनी दिले भाजप-मनसे युतीचे संकेत

जळगाव  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यावरून आक्रमक पावित्रा घेतला होता. मशिदींवरील भोंग्यांसमोर लाऊ़डस्पीकर लावून हनूमान चालीसा वाजवण्याचा इशारा दिला होता. या त्याच्या भूमिकेच भाजप नेत्याकडून कौतूक करण्यात आले होते. या राज ठाकरेंच्या  या भूमिकेनंतर भाजप-मनसे युतीच्या  चर्चांना उधाण आले होते.त्यात आता भाजप नेते गिरीश महाजन  यांनी भाजप-मनसे युतीचे संकेत दिले आहेत.
 
जळगाव येथे होमिओपॅथी संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री गिरीश महाजन  उपस्थित होते.यावेळी माध्यमांनी गिरीश महाजन  यांना भाजप-मनसे युतीबाबतचा  प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी 'वेळ जवळच आहे, आता काही फार दिवस नाहीत', असं म्हणत गिरीश महाजनांनी  यांनी युतीचे संकेत दिले होते. राज ठाकरे यासंदर्भात बोलल्यानंतरच आपल्याला कळेल, त्यांच्या मनात काय आहे आणि ते काय बोलणार आहेत, हे आम्ही सांगू शकत नाहीत . पण 'वेळ जवळच आहे, आता काही फार दिवस नाहीत', बघूया, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा गिरीश महाजन यांनी निषेध केला. शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, मात्र ही वेळ का आली असा सवाल उपस्थित करत गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.