शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 मे 2023 (08:05 IST)

“मैं हूँ डॉन…” गाण्यावर थिरकले धनंजय मुंडे, परळी, भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

dhananjay munde
राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकीचे आज निकाल हाती आले असून, सर्वच ठिकाणचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान सर्वांचच लक्ष लागून असलेल्या बीडमधील परळी बाजार समितीच्या निवडणूकीत अखेर धनंजय मुंडे यांच्या पॅनलने एकहाती विजय मिळवला आहे. मुंडेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पॅनलने १८ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय
 
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बसलेला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या पॅनलने विजय मिळवताच आमदार धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा केला असून “मै हू डॉन…” या गाण्यावर भन्नाट डान्सही केलाय. धनंजय मुंडेंच्या केलेल्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
 
व्हायरल झालेल्या व्हिडीओत धनंजय मुंडे हे कार्यकर्त्यांसह गुलाल उधळून डीजेच्या तालावर “मै हू डॉन…” या गाण्यावर ठेकाही ठरताना दिसून येत आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजच्या निकालावरून बीडच्या ग्रामीण भागावर धनंजय मुंडे यांचं चांगलंच वर्चस्व असल्याचं दिसून आलं आहे.
 
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर मुख्यमंत्रीपद असलेल्या शिंदे गटाची मात्र दारुण अवस्था झाली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष बीडमधील परळी आणि अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
 
या निवडणुकीच्या निमित्ताने मुंडे भाऊ-बहीण पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. पंकजा मुंडे या परळीतच ठाण मांडून होत्या. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आपआपलं पॅनल निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं होतं. मात्र, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पंकजा मुंडे यांना धक्काच बसला आहे. पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे सर्वात कमी उमेदवार निवडून आले आहेत. पंकजा यांचा बाजार समितीतील हा सर्वात मोठा पराभव असल्याचं मानलं जात आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor