बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (15:45 IST)

पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या

murder
वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहिद येथील नवीन आष्टीच्या वस्तीत आज पहाटे पोत्यात बांधून असलेला मृतदेह फेकलेला आढळल्याने खळबळ उडाली होती. काही वेळातच मृतदेहाचे ओळख पटली. जगदीश भानुदास देशमुख असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी जगदीशच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली असून तपासानंतर सहभागी असलेल्या इतर जणांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पोत्यात बांधून मृतदेह फेकलेला आढळला. या व्यक्तीची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने मृतदेह फेकून दिल्याचा प्राथमिक तपासात समोर आले आहे.मृतदेहाचा ओळख पटवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.अवघ्या काही तासातच पत्नी दीपाली जगदीश देशमुख हिला व प्रियकर शुभम भिमराव जाधव यांना ताब्यात घेतले. दोघांनी हत्या केल्याची कबुली दिली.
 
शुभम याचे जगदीशच्या पत्नीसोबत विवाहबाह्य प्रेम संबंध होते. जगदीश हा दारूच्या व्यसनाधीन असल्याने पत्नीसोबत वादविवाद करायचा. त्यामुळे पत्नी त्रासलेली होती. त्यामुळे त्याची हत्या करण्याचा कट रचला त्यादिवशी पत्नीचा प्रियकर हा मृतकाच्या घरी झोपला होता, दोघांनी हत्येचा कट रचून जगदीशच्या डोळ्याजवळ व कमरेवर लाकडी रॅपने मारहाण करुन दुखापत केली व त्याचा गळा आवळून खून केला. ही घटना 3 व 4 फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. हत्येचा पुरावा लपवण्याचा उद्देशाने मृतदेह लपवण्यासाठी पोत्यात बांधून घराजवळच्या रस्त्याच्या काठावर नालीजवळ आणून फेकून दिला होता. या प्रकरणाचा उलगडा झाल्याने दीपाली जगदीश देशमुख व तिचा प्रियकर शुभम भीमराव जाधव याला अटक केली असून तपास सुरू आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंकी, पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, उपनिरीक्षक देरकर,शेख नबी ,बालू वैराळे, राहुल तेलंग, संजय बोकडे उपस्थित होते.