गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (15:41 IST)

तेव्हा उद्धव ठाकरे कॅमेरा घेऊन जंगलात फिरत होते : निलेश राणे

राजकारणात आम्ही इन्क्युबेशन सेंटर म्हणजेच उबवणी केंद्र उघडले होते. परंतु आम्ही नको ती अंडी उबवली असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणै दौऱ्यात एका कार्यक्रमात केलं. मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता हा भाजपला टोला लगावला आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपशी युती ही बाळासाहेबांनी जपली आहे. तेव्हा उद्धव ठाकरे कॅमेरा घेऊन जंगलात फिरत होते असा घणाघात निलेश राणेंनी केला आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्ही नको ती अंडी उबवली त्याचे पुढे काय झाले तुम्ही बघता आहात असे वक्तव्य करत भाजपवर निशाणा साधला होता. यावर निलेश राणेंनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पलटवार केला आहे. मुख्यमंत्री काय बोलतात हे कळण्यासाठी ट्रान्सलेटरची गरज लागते. भाजपशी युती ही बाळासाहेबांनी जपली आहे. २५ वर्षे बाळासाहेबांनी युती जपली, त्यावेळी १९९५ पर्यंत उद्धव ठाकरे जंगलात कॅमेरा घेऊन फिरत होते. त्यावेळी ते राजाकारणात कुठेच नव्हते. त्यांचा संबंध कुठेच नव्हता मग भाजपशी उद्धव ठाकरे यांचा संबंध काय? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.