रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 जानेवारी 2024 (09:30 IST)

अंतरवाली सराटीतील मराठ्यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही

maratha aarakshan manoj
जालना : मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावे यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून तीव्र आंदोलन करत आहेत. तसेच येत्या 20 जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने कूच करत आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात मुंबई येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मात्र मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची तसेच अंतरवाली सराटीमधील मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
मराठा समजातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, अंबड तालुक्यातील 12 गावांमध्ये केवळ 127 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तसेच अंतरवाली सराटी येथे एकही कुणबी नोंद सापडलेली नाही. त्याबरोबरच मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे यांच्या कुटुंबामध्ये एकही कुणबी नोंद सापडलेली नाही. दरम्यान, याबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, कुणबी नोंदी सापडल्या नाहीत की त्या जाणूनबुजून मिळवल्या नाहीत, हा प्रश्न आहे. पण आम्ही मागे हटणार नाही. राज्यातील समाज आमचाच आहे. एक इंचही मागे हटणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी ठकावून सांगितले.
 
Edited By - Ratnadeep ranshoor